जिल्ह्यातील वाढीव संचारबंदीचा आदेश मागे घेण्याची भाजपने केली मागणी

6

परभणी जिल्ह्यात वाढीव संचार बंदीचा आदेश त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना परभणी भाजपाच्या वतीने देण्यात आले. परभणी जिल्ह्यात मागील २४ मार्च पासून सुरु असलेल्या संचारबंदीने जिल्ह्यातील व्यापारी,छोटे व्यापारी, शेतकरी,रोजंदारीवर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

सदरील संचार बंदीच्या काळात पण रुग्णसंख्यात घट न होता वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा परिस्थिती मध्ये पुरेशी आरोग्य सुविधा देण्यात भर द्यावा आणि लागू केलेली संचारबंदी टाळण्यात यावी. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, शाळा,महाविद्यालये,इतर व अंतर्गत जिल्ह्यातील वाहतूकीवर ह्यावर 15 एप्रिल पर्यंत लावलेली बंदी ठीक आहे ,पण संचार बंदी करून सर्वसामन्यांचे जगणे अवघड करू नये असे म्हटले.

प्रशासनाने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीचा विचार करून परभणी जिल्ह्यातील लागू करण्यात आलेली संचारबंदी त्वरित रद्द करून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, मनपा गटनेत्या सौ.मंगलताई मुदगलकर, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे आदीने दिले आहे.