ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणात भाजपने चांगले यश मिळवले. त्याच पार्श्वभूमीवर प्रदेश सचिवपदी माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीत ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
भाजपची विभागीय बैठक मुंबई येथे भाजपा कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. याची दखल म्हणून माजी खासदार निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असं बोललं जात आहे.