गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. आता एका गावातील शेतकऱ्यांनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.
हरियाणातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गावात भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. कर्नालमधील इंद्री गावातील कादराबादच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय. भाजप किंवा जेजेपीच्या नेत्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चपलेचा हार घातला जाईल, असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
सदरील गावकऱ्यांनी गावाबाहेर एक बॅनर लावला आहे. जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल तोच गावात राहिल, असे बॅनरवर लिहिलण्यात आले आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिनही नवीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे त्या बॅनरवर लिहलेले आहे.