कर्नाटक राज्यामध्ये एक आक्षेपार्ह सिडी प्रकरण चांगलेच गाजले. परिणामी या सिडीमुळे कर्नाटकच्या मंत्रिमंडळाती भाजपचे जलसंपदामंत्री रनेश जारकीहोळी यांना राजिनामा द्यावा लागला आहे. एका तरुणीला नोकरीचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे काही पुरावे या सिडीमध्ये आहेत. यावरुनच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर निशाना साधला आहे. “कॉंग्रेसने कर्नाटकला आयटी हब बनवले, भाजप तर कर्नाटकला पॉर्न हब बनवतेय” अश्या कठोर शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
एका तरुणीला नोकरी लाऊन देण्याचे अमिष दाखवून तिला शरीरसंबंद्ध ठेवण्याबाबत बोलत असतांनाचा काही भाग या सिडीमध्ये आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी ही सिडी मिडियासमोर आणली. तसेच रनेश जारकीहोळी यांनी संबंद्धित महिलेवर अत्याचार केल्याचा दावासुद्धा केला. परिणामी कर्नाटकातील वातावरण तापले आणि जारकीहोळी यांना राजिनामा द्यावा लागला. बदनामी करण्यासाठीचे षड्यंत्र असल्याचे जारकीहोळींनी म्हटले आहे.
संबद्धित पिडीत तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाठी संपर्क साधला. ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमीटेड कंपनीत नोकरीचे अमिष दाखवून रामेश जारकीहोळींनी शरीरसुखाची मागणी केल्याचे पिडीतेकडून सांगण्यात आले. संपूर्ण प्रकरण ऐकुन घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार केली आणि पिडीतेला व तिच्या कुटुबियांना संरक्षण देऊन त्यांना न्याय देण्यात यावा असे दिनेश हलकळ्ळी यांनी सांगीतले आहे.
दरम्यान “कर्नाटकची अोळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकला आयटी हब बनविणे हे कॉंग्रेसचे धोरण होते. त्यानंतर कॉंग्रेसने कर्नाटकला आयटी हब बनवलेसुद्धा. मात्र आता अशी प्रकरणं समोर येऊ लागल्यावर असे वाटते की भाजप कर्नाटकला आता पॉर्न हब बनवतेय” असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.