भाजप हा जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष आहे : सचिन सावंत

44

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी दिला होता. पण सरकारने एकही प्लांट उभारला नाही, हे पैसे राज्य सरकारने गायब केले, असा गंभीर आरोप भाजपने केला होता.

भाजप हा जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष आहे. वस्तुस्थिती- केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही. असे भाजपच्या या आरोपाला सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी उत्तर दिले आहे.

तसेच प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारनेच ठरवली. 5 एप्रिल 2021 नंतर मशीन पुरवत आहेत. सिंधुदुर्गाला अजून दिली नाही’ असा पलटवार सावंत यांनी केला.