भाजप नेते गोपीचांद पडळकर काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत. काँग्रेसचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचं सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे. पडळकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पडळकर यांनी काँग्रेस मंत्र्यांवर यावेळी हल्लाबोल केला. काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सत्तेचे वेसन बांधल्या गेल्याने हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे माना डोलावण्याचं काम करत आहेत. असा जहरी टोला त्यांनी लगावला.
तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार असल्याचे पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी यांना नेमकं पडळकर काय कळवतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.