महाराष्ट्रातील भाजपचा दिग्गज नेता करणार शरद पवारांवर पिएचडी

0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या बाबतीत एक वक्तव्य केली होती. मात्र, ते वक्तव्य त्यांच्याबद्दल नव्हतं, तर सर्वांबद्दल होतं असं म्हणत सारवासारव केली. आपण तर शरद पवार यांच्यावर पिएचडी करणार असल्याचा निर्वाळा सुद्धा त्यांनी दिलाय. काय म्हणाले चंद्रकांत पाटील पाहू…

‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता त्यांनी, ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, तर सर्वांबाबत होतं असं म्हटलंय. तसंच आपण शरद पवारांवर पीएचडी करत असल्याचा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. 50 वर्षांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. देशातील आणि राज्यातील असा एकही प्रश्न नसेल जो त्यांना माहित नाही. त्यांनी उभी हयात जनतेच्या हितासाठी, विकासासाठी घालवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील जर शरद पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच आहे.’ असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.