विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पुणे, नागपूर, औरंगाबाद या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघामध्ये विजय मिळवला. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने वादग्रस्त ट्विट करत असतात. दरम्यान, विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. यावरून निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
वाह अजित दादा वाह!! एका वर्षा पूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमु्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का. असे निलेश राणे म्हंटले आहेत. निलेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.