अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला ‘इतका’ निधी

181

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे. शिवसेनेने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी अनेक नेते, व्यापारी, संस्था, तसेच सामान्य नागरिक आपला वाटा, उचलत आहेत.

राम मंदिर उभे करण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे.

माजलगाव येथील मंगळवारी एका कार्यक्रमात त्यांनी निधीचा धनादेश संकलकांकडे दिला. राम मंदिर निर्माणासाठी जिल्हयातून जास्तीत-जास्त निधी संकलन करावे असे आवाहन मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

राम मंदिर उभारणीसाठी अनेकांनी मोठ्या देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाख रुपये, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.