ब्रूक फार्माकडून रेमडिसिविर इंजेकशन्स विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत होते. मात्र, आता त्यावर खुद्द मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केला आहे.
रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा व साठा यावरून उलट सुलट तर्क लावल्या जात आहेत. आणि यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे.
कुठलाही पक्ष हा वयक्तिक रित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही, त्यांना तो सरकारला द्यावा लागतो. भारतीय जनता पक्ष रेमडीसीविर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोसिएल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. असे शिंगणे म्हणाले आहेत.
कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वयक्तिकरित्या विकता येत नाहीत किंवा वाटता येत नाहीत. ते त्यांना सरकार लाच द्यावे लागतील. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे.
असं शिंगणे यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सदरील इंजेक्शन संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये मोठा कलगीतुरा रंगला होता. त्याचबरोबर शिंगणे यांच्याबाबत अनेक बातम्या मिडियामधून बाहेर आल्या होत्या.