सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रानंतर आत्ता त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचसाठी काल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली.
हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, ”दिल्ली येथे रामलिला मैदानावर २०१८ साली मी सात दिवसांचे उपोषण केले, त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री गजेंद्र शेखावत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडण्यासाठी पाठविले होते. त्यात उल्लेख केला होता, की सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थिक बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे. असे लखी पत्र दिले होते ते पत्र सुद्दा मी आपणास माहितीस्तव पाठवत आहे.
विखे यांनी हजारे यांची याच मुद्द्यांवर भेट घेतली. हजारे यांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित शेतक-यांच्या प्रश्नांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशः लक्ष घातले असून या प्रश्नी सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील असून ते केंद्र सरकारच्या सतत संपर्कात असल्याची माहिती भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांना दिली.
बोलताना विखे पाटील म्हणाले, ”अण्णांनी उपस्थित केलेले स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे यासह अन्य काही यांनी मांडलेले शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते फक्त केंद्राशी संबंधित नसून त्याचा राज्याशीही संबंध आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस केंद्राशी संपर्कात राहून सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील आहेत.