भाजपने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीताचे गायन करत राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमुल युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष आहे. एक व्हडिअो ट्वीट करत त्यांनी हा दावा केला आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यानुसार, भाजप नेत्यांनी हावडामध्ये एका सार्वजनिक रॅलीत राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीनं गायलं आहे. यावरून पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तु-तू, मै-मै सुरु झालयं.
'देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा प्रचार करणारे राष्ट्रगीतही योग्य पद्धतीनं म्हणू शकत नाहीत. हा तोच पक्ष आहे जो भारताच्या सन्मान आणि गौरव कायम राखण्याचा दावा करतो. हे सगळं लज्जास्पद आहे! नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप या 'राष्ट्रद्रोही' कृत्यासाठी माफी मागणार?' असा सवालदेखील त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ऊपस्थित केला आहे. तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनीसुद्धा अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यास दुजोरा देत भाजपने राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान भाजपकडून हे आरोप फेटाळन्यात आले आहे. ‘तृणमूल काँग्रेसनं भगवान राम आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मुद्यावर ज्या पद्धतीनं राजकारण केलं त्याच पद्धतीनं ते राष्ट्रगीतावरही राजकारण करत आहेत’ असं भाजप नेते शमिक भट्टाचार्य यांनी यावेळी म्हटले आहे.