“पुजा केल्याने कधी पापं धुतली जात नाहीत” राठोड यांच्या भूमिकेवर भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया

28

वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर पंधरा दिवसांनंतर माध्यमांसमोर येत मौन सोडले आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाणार्‍या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी राठोड यांनी कुटुंबासमवेत ऊपस्थिती लावली होती. पोहरादेवी येथे धार्मिक विधिसुद्धा त्य‍ांनी केले. मात्र यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “पुजा केल्याने केलेली पापं धुतली जात नाही” अशा प्रतिक्रिया भाजपकडून येत आहेत.

पुजा चव्हान टीकटॉकस्टार तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट राठोड यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली होती. त्य‍ानंतर राठोड यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा भाजपकडून करण्यात येत होती. संजय राठोड यांनी यादरम्यान कुठलिही प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र अखेर त्यांनी मौन सोडले आहे. माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राठोड हे पोहरादेवी याठिकाणी येणार हे कळताच त्यांच्या समर्थक‍ांनी पोहरादेवी येथे प्रचंड गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या नियमांना तीलांजली दिल्याचव चित्र होते.

चित्रा वाघ यांनी “संजय राठोड हे आमच्यासाठी अद्यापही पुजा चव्हानचे हत्यारेच आहेत. कारण व्हायरल अॉडिअो क्लीपमधील आवाज त्यांचाच आहे हे स्पष्ट आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच १५ दिवसांनतर समोर येऊन राठोड यांनी समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या गुन्हा केल्यानंतर अशाप्रकारे समाजास वेठीस धरण्याचा प्रकार खपवुन घेतला जाणार नाही. असा दमसुद्धा दिला आहे.

पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तीप्रदर्शनावर भाजपचे प्रवक्ते केशव ऊपाध्ये यांनी निशाना साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनासंबंद्धी नियम पाळा अन्यथा कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. आता त्यांच्या मंत्र्यावर कारवाई होणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. ईतके दिवस संजय राठोड कुठे होते? असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी ऊपस्थित केला आहे.