पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं:अजित पवार

20

नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे. असं म्हणत अजित पवार यांनी भाजपमधल्या कथित गटबाजीवर बोट ठेवलं आहे.हिवाळी अधिवेशानादरम्यान विधानसभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग. याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलं आहे. आता मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.

पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भाजपने तिथं घेतल्याने आली. अमरावतीला चुकलं, पण एक समाधान आहे तिथं भाजपचा आला नाही

तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने त्यांना दुःख झालं. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल, पण ते गेलं नाही, वर्षात जाईल म्हणाले, पण तरीही गेलं नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते आमच्या पाच जागा येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल. पण निकाल वेगळे लागले.असाही टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.