रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते

64

शेतकर्‍यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना..भाजपची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

माहितीच्या अधिकारात काय विचारले? किती सामंजस्य करार झाले, त्यातून किती रोजगार अपेक्षिले गेले आणि त्याची आकडेवारी मांडून या राज्यातील सुजाण नागरिक अजीबात भुलणार नाही म्हणून आदु बाळा, रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते.

आदित्य ठाकरेंच्या एका ट्विटला उत्तर देताना भाजपने ठाकरेंचे सर्व दावे आकडेवारी सहित खोडुन काढले, माहितीच्या अधिकारात काय विचारले? किती सामंजस्य करार झाले, त्यातून किती रोजगार अपेक्षिले गेले आणि त्याची आकडेवारी मांडून या राज्यातील सुजाण नागरिक अजीबात भुलणार नाही. आता आम्ही सांगतो, महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एमओयूपैकी 23 टक्के कधी अंमलातच आलेले नाही, हाच दर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इतिहासातील सर्वाधिक होता.

संपूर्ण आकडेवारी समजून घ्या.
– 2016 मेक इन इंडिया : एकूण एमओयू 338/गुंतवणूक : 3,66,214 कोटी
– 2018 मॅग्नेटिक महाराष्ट्र : एकूण एमओयू 2437/गुंतवणूक : 5,45,121 कोटी
– 2019 ते 2022 : एकूण एमओयू 99/गुंतवणूक : 1,93,704 कोटी
– वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 : एकूण एमओयू : 25/गुंतवणूक : 80,498 कोटी
– वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 : एकूण एमओयू : 19/गुंतवणूक : 1,37,666 कोटी

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाशी तुम्ही स्पर्धा करुच शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली. आता तुमचे सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला आहे. अपेक्षित रोजगाराची संख्या विचारुन काय साध्य कराल, आकडेवारी द्यायचीच असेल तर किती रोजगार दिले, ते विचारा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. नाहीतर शेतकर्‍यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना…

आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील ५ वर्षे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील ३० महिने याची तुलना करून उद्धव ठाकरेंचे कार्यकाळ चांगला होता असे ट्विट केला होता.

https://x.com/AUThackeray/status/1703347752955158814?s=20

https://x.com/BJP4Maharashtra/status/1703443340832678354?s=20