पुजा चव्हान आत्महत्या प्रकरण भाजपकडून चांगलेच लावून धरण्यात आले आहे. भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ याप्रकरणी राज्यसरकारवर कडाडून टीका करत आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी भाजप आग्रही झाली आहे. याप्रकरणावरुनच भाजप महिला मोर्चाच्यावतीने आक्रमक पवित्रा घेतला असून, याविरोधात महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या थेट रस्त्यावर ऊतरल्या आहेत. राज्यभर विविधठिकाणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने निदर्शने करण्यात आले. दरम्यान महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकडसुद्धा करण्यात आली. यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून महाविकासआघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला अाहे.
चित्रा वाघ यांनी पुण्यात ज्याठिकाणी पुजाने आत्महत्या केली त्याठिकाणी घटनास्तळावत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत पोलिसांच्या चौकशीवर सवाल ऊपस्थित केले. तसेच पुरावे समोर आले असतांनासुद्धा सरकार संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे सरकारवर कडाडून टीका केली. यानंतर आज(दि.२७ फेबृ) भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
पुजा चव्हान ही मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे. टीकटॉकस्टार म्हणून ती नावरुपास आली होती. तसेच तिला राजकीय आणि सामाजिक विषयांतसुद्धा रस होता. बीडमधील भाजपची ती सक्रीय कार्यकर्ता होती. या पार्श्वभूमिवरच बीड येथे संजय राठोड यांच्या पुतळ्याचे दहन करत महिला मोर्चाने आंदोलन केले.
कोल्हापुर महिला मोर्चाच्यावतीनेसुद्धा तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राठोड यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली.
वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील अनेक पुरावे समोर आले असूनदेखील सरकार राठोड यांच्यावर कारवाई करत नाही. परिणामी परभणी येथे महिला मोर्चाच्यावतीने चक्काजाम करत सरकारचा धिक्कार करण्यात आला.
पुजा चव्हान हीच्या आत्महत्येस वनमंत्री संजय राठोड जवाबदार असल्याचे स्पष्ट दिसत असतांनासुद्धा सरकार कारवाई करण्यास ऊत्सुक नाही. त्यामुळे धुळे याठिकाणी महामार्गावर ठिय्या मांडून महिला मोर्चाच्यावतीने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.