जागतिक महिला दिनी भाजपच्या महिला आमदार मनीषा चौधरींनी मुख्यमंत्री व मविआ सरकारला ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावरून सुनावले खडे बोल.

19

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन मागच्या ८ दिवसांपासून सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे आज ८ रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. ताप्तुर्वी आज सभागृहाची सुरुवात होत असतानाच आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहातर्फे सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडी सरकार निर्माण होऊन दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची अजून नियुक्ती केलेली नाही. राज्यातील असंख्य महिलांना दाद मागण्यासाठी केंद्रीय महीला आयोगाकडे धावून जावे लागत आहे. महिला दिनानिमित्त महिलांच्या हितासाठी आजच्या आज महिला आयोगाच्या अध्यक्षा नियुक्त केले पाहिजे अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी आज सभागृहात केल्या.

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी मागच्या दीड वर्षापासून कोणीही नाहीत हेही तेवढेच खरे आहे. आज जागतिक महिला दिनी राज्यातील महिलांना त्यांचा आवाज ऐकणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नेमून महिलांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या महाविकास आघाडी सरकार भेट देतील काय हेही औत्सुक्याचे राहील.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण दावा करेल ? अध्यक्षपद शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस कोणाला मिळेल याचीही सर्वांना उत्सुकता लागून आहे. शिवसेनेला जर संधी मिळाली तर आमदार यामिनी जाधव, मनीषा कायंदे राष्ट्रवादीला संधी मिळाल्यास रुपाली पाटील चाकणकर, विद्या चव्हाण आणि जर कॉंग्रेस ला संधी मिळाल्यास प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आता प्रत्यक्षात कोणाला हि महत्वाची जबाबदारी मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील.