चक्क भाजप खासदाराला गडकरींवर विश्वास; कोरोना परिस्थितीची जबाबदारी गडकरींकडे देण्याची मागणी

15

कोरोना जागतिक संकटाने देशाचे कंबरडे मोडले आहे. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमणात तुटवडा निर्माण झालाय. देशातील आरोग्य व्यवस्था कोरोनाचे संकट निभावू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

यासर्व परिस्थितीवर केंद्रातील मोदी सरकारला भाजप खासदाराने सल्ला दिलाय. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील कोरोना स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतून विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.

‘भारताने मुस्लीम आक्रमण आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो.

अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल,’ असे ट्विट करून खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.