‘भाजप खासदाराच्या पत्नीचा काँग्रेसमध्ये प्रवेश’

58

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. नुकतंच अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. भाजपचे नेते अमित शहा यांनी बंगालची सगळी सूत्र हाती घेतल्याने पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल असा राजकीय अंदाज आहे.

आता मात्र उलट घडलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तृणमुल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे खा.सौमित्र खान यांच्या पत्नीने तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सौमित्र खान हे पश्चिम बंगालच्या बिशूनपुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना याबाबत विचारले असता खान त्यांनी प्रसारमाध्यामांना दिलेल्या माहितीनुसार याबाबत मला काही माहिती नाही. ‘माझ्याझी न बोलताच पत्नीने हा निर्णय घेतला आहे’. तर त्यांच्या पत्नी सुजाता यांनी म्हटलं की, घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या पाहिजेत. सुजाता यांच्या पक्ष प्रवेशावेळी तृणमुल काँग्रेसचे खा.सौगत रॉय आणि प्रवक्ते कुणाल घोष उपस्थित होते.