राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आणि सोशल मीडियावरून शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी २६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत घडला आहे.आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले.