भाजप पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करेल : बिप्लब कुमार देब

7

भाजपच्या विस्तार योजनेवर बोलताना त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बिप्लब कुमार देब  यांनी गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या एका बैठकीचा संदर्भ देत भाजप पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करेल असे वक्तव्य केले आहे .

नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचं सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे, असं देब यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सांगितलं. २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. 

तीन वर्षांपूर्वी झालेल्या त्या बैठकीत शहांनी परदेशातील विस्ताराच्या योजनेवर भाष्य केलं होतं. त्यावेळी आम्ही अतिथीगृहात बसलो होतो. पक्षाचे ईशान्य झोनचे सचिव अजय जम्वाल बैठकीला हजर होते. भाजपनं अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं ते म्हणाले.

यावेळी देब यांनी अमित शहांच्या नेतृत्त्वाची मुक्तकंठानं स्तुती केली. अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष झाल्याचं ते म्हणाले. ‘केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलतं. डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत येतात. पण हा ट्रेंड भाजप बदलेल. केरळमध्ये भाजपचं सरकार येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.