संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजप सहभागी होणार : चंद्रकांत पाटील

6

संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजप सहभागी होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणार्‍या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपची भूमिका आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता असेही प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात अशी टिकाही पाटील यांनी केली.