पायी वारी झालीच पाहिजे, कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत : भाजप अध्यात्मिक आघाडी

14

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी या वारकरी सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, यंदाच्या वर्षीही कोरोना संकट डोक्यावर आहे. तरीही अनेक शतकांची परंपरा असलेल्या पायी वारी ला परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने केली आहे.

यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. अशी अपेक्षा भाजप अध्यात्मिक आघाडीच्या आचार्य तुषार भोसले यांनी बोलून दाखवली आहे.

मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. त्यामुळे राज्य शासन यावर काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.