भाजपच्या महिला आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन

10

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून रुग्णांच्या मृत्युची संख्या देखील वाढत चालली आहे. राजस्थान मधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात शोककळा पसरली आहे. त्यांचा कोरोना अहवाल नुकताचं पॉझिटिव्ह आला होता.

किरण माहेश्वरी यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनामुळे निधन होणाऱ्या माहेश्वरी या दुसऱ्या आमदार आहेत. यापूर्वी आमदार कैलास त्रिवेदी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. “किरण माहेश्वरी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवेसाठी समर्पित केले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे.” असे म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील किरण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच माजी मंत्री राजसमंदचे आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशी आम्ही प्रार्थना करतो. ओंम शांती, असे ट्विट राजस्थान भाजप समर्थकांनी केले आहे.