भाजपच्या ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

100

११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा या महिलेने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पोलिसांत धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी, अशी मागणी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. असे उमा खापरे यांनी म्हंटले आहे.

तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करत असल्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.