पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडी सरकाविरुद्ध भाजपने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. नुकतेच अधिवेशनात आम्ही हा मुद्धा ऊचलुन धरु अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर काल(दि.२७ फेबृ) दिवसभरात राज्यात विविधठिकाणी भाजपच्या महिला मोर्चाच्यावतीने चक्काजाम करण्यात आला. आता यापठोपाठ भाजप युवा मोर्चासुद्धा मैदानात ऊतरणार आहे. नुकतेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत याची माहिती दिली आहे.
सर्वकाही ढळढळ दिसत असतांनासुद्धा झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी दि.१ मार्चला राज्यभर नगाडा बजाव आंदोलन करणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी या पत्रकात नमूद केले आहे. पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणी अनेक सवाल यावेळी ऊपस्थित करत सरकारच्या ढीम्म कारभाराचा नगाडा वाजवून निषेध करण्यात येणार आहे. असे विक्रांत पाटील यांनी या पत्रकात नमुद केले आहे.
आतापर्यंत पुजा चव्हानच्या आत्महत्येनंतर १२ अॉडिअो क्लीप व्हायरल झाल्या आहेत. अबेक पुरावे समोर आले आहे. ज्यामध्ये संजय राठोडच मुख्यआरोपी आरोपी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे संजय राठोड यांनी राजिनामा द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे.
पुजा चव्हान ही राजकीय आणि सामाजिकतेचे भान असणारी युवती होती. महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या युवतीवर झालेला अन्याय भाजप युवा मोर्चा कदापी सहन करणार नाही. तसेच राज्यात महिलांवर होणाते अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेम मात्र सरकार हे ऊघड्या डोळ्यांनी बघते आहे. त्यामुळेच झोपेचे सोंग घेतलेल्या या कुंभकर्णरुपी सरकारला जागे करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. असे भा.ज.यु.मोच्यावतीने सांगण्यात येत आहे.