राज्यात काही राजकीय भूकंप होऊन पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेत येईल अशी आशा भाजपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातल्या युवा वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. या युवा वर्गाची ऊर्जा पक्ष वाढीसाठी वापरण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे.
मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने जे काही निर्णय घेतले त्या शिवाय या सरकारने काहीही केलेले नाही, असं नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल युवा वर्गात मोठं आकर्षण आहे.
ओबीसींच्या हक्कासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषद घेणार असल्याची माहिती पक्षाचे नेते आशिष शेलार यांना दिली.पक्षाला राज्यात मजबूत करण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा शत प्रतिशत भाजपची योजना तयार केली आहे.
भाजपच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.