देशाला वैभवापर्यंत नेऊन जगातील सुपर पॉवर बनविण्याचे भाजपचे ध्येय : चंद्रकांत पाटील

7

भाजपच्या 41 व्या वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर व्हर्च्युअल रॅलीदरम्यान पाटील बोलत होते. त्यावेळी केवळ निवडणुका जिंकणे हा भाजपचा उद्देश नसून देशाला वैभवापर्यंत नेऊन जगातील सुपर पॉवर बनविण्याचे ध्येय असल्याचे विचार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केले.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे आदी उपस्थित होते.

भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे. या पक्षाला वैचारिक बांधिलकी आहे. देश, धर्म, समाज आणि समाजातील सामान्य माणसाचा विचार करून पक्ष कार्य करीत आहे. लोकशाहीत राजकीय जीवनात कसे काम करावे याचा आदर्श या पक्षाने घालून दिला. असे खासदार बापट म्हणाले.