भाजपचा ‘हा’ आमदार धरणार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात उपवास

14

बालियामधील बैरियामधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत खासदार विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर आरोप केले.आता विरेंद्र सिंह मस्त आणि बालियाचे जिल्हाधिकारी यांना चांगला विचार करता यावा यासाठी 101 तासांचा उपवास धरणार आहेत. 

सुरेंद्र सिंह यांच्या आरोपावर भाजप खासदार मस्त यांचे खासगी सचिव अमन सिंह यांनी भाजप आमदारांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा दावा केलाय. माध्यमांसमोर आरोप करण्यापेक्षा आमदारांनी कायदेशीर लढाई लढावी,असं आवाहन अमन सिंह यांन केलेय.

मी शांत आहे याला माझी कमजोरी समजू नका, असं विरेंद्र सिंह यांनी ठणकावलं आहे. ‘समाजात द्वेष पसरवून कोणी समाजाचं भलं करु शकत नाही. मी बोलत नाही याचा अर्थ मी घाबरतो किंवा कमजोर आहे, असं समजू नका, असा इशारा विरेंद्र सिंह मस्त यांनी दिला.

सुरेंद्र सिंह यांनी उपवासाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटले. ते खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सदबुद्धी मिळण्यासाठी 101 तासांचा उपवास करणार आहेत.

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह त्यांच्या पक्षाचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.