दिल्लीतील कालच्या हिंसाचारामागे भाजपचा हात, हा तर अपप्रचार : चंद्रकांत पाटील

21

केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही अद्याप सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी केल आहे.

‘काल उसळलेल्या हिंसाचारामागे भाजपचा हात आहे असा दावा काही राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यानंतर दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे,’ असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.