शरद पवार यांनी खतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय रसायने व खतमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठविले होते. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली.
शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. खतांच्या दरवाढीमुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली.
तसेच केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.