कोरोनाने पुन्हा एकदा वेगाने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमिवर शासन आणि प्रशासनाकडून काळजी घेण्याचे अावाहन जनतेस करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी नुकतेच समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री दरवेळी नविन ऊपक्रम राबवत जनजागृतीचा प्रयत्न करत असतात. यावेळीसुद्धा जर नियमांचे पालन केले नाही तर स्वत:च्या हानीस मीच जवाबदार असेन. असे म्हणत “होय मी जवाबदार” हा नविन ऊपक्रम त्यांनी सुरु केला आहे. मात्र भाजप यावरुन मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरण्याचा प्रयत्न करते आहे.
भाजपा महाराष्ट्रच्या ट्वीटर हॅण्डलवरुन महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांच्या कार्यक्रमादरम्यान कशाप्रकारे कोरोनाच्या नियमांना तीलांजली दिली जाते आहे. हे भाजपने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कार्यक्रमातील फोटो टीपत त्यावर ऊद्धव ठाकरेंचा फोटो लावून होय मी जवाबदार असे मीम्स शेअर केले जात आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका कार्यक्रमातील हे फोटो आहेत. ज्यामध्ये फीजीकल डीस्टन्सींगचे कुठेही पालन होतांना दिसत नाहीये.
जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे हे फोटो आहेत. ज्यामध्ये मास्क आणि फीजकल डिस्टन्सींगच्या नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे नुकतीच जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली आहे.
कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारत असतांनाच्या कार्यक्रमाचे फोटो आहेत. ज्यामध्ये कुठेही नियमांचे पालन झालेले अाढळत नाही.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऊद्घाटन कार्यक्रमावेळीसुद्धा कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते.
कोरोना प्रसाराचा वाढता वेग बघता, राज्यभरात कडक निर्बंध लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सर्व कठोर नियम हे फक्त सामान्यांसाठीच आहेत का? असा सवाल ऊपस्थित करण्यात येत आहे. माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या सुपुत्राच्या लग्नसमारंभातसुद्धा सर्वपक्षीय नेते ऊपस्थित होते. यावेळीसुद्धा कुठल्याही नियमाचे पालन होत नसल्याचीच परिस्थिती होती.
सर्वसामान्यांवर नियमांचे ऊल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येते. मग आता लोकप्रतिनिधींवरसुद्धा कारवाई होणार का? असा प्रश्न ऊपस्थित करण्यात येत आहे.