‘पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती’, मंगळवेढ्यात जयंत पाटील म्हणाले…

57

आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुक निमित्ताने भगीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. त्यामुळे वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता.

मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले तेव्हा मंत्री केलं नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका भारत नानांनी घेतली होती. अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.

योगायोगाने मी जलसंपदा मंत्री झालो आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतलं असं कळलं पण कधी इथे फिरकले नाही. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा मानस आहे.

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.