एकनाथ खडसेंकडून भाजपच्या चींतेत वाढ, १३ नगरसेवकांचा भाजपला रामराम!

13

एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीने ते चार दशकांपासून सक्रीय आहेत. ऊत्तर महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव अद्यापही अोसरला नसल्याची परिस्थिती आहे. काही दिवसांअगोदर भाजपमधील अंतर्गत बाबींना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपसाठी हाच सर्वात मोठा धक्का होता. मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपला देणार्‍या धक्क्यांची मालीका कायम ठेवली आहे. भुसावळ नगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसेंच्या ऊपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींकडून वारंवार एकनाथ खडसे यांना डावलले जात असल्याचे चित्र होते. याच कलहाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यापाठोपाठ भाजपमधील अनेक खडसे सनर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीसुद्धा खडसेंचाच हात धरला होता. त्यानंतर लगेच पक्षविस्तारासाठी खडसेंनी कामसुद्धा सुरु केले. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमीत्तसुद्धा जयंत पाटील यांच्या ऊपस्थितीत अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

भुसावळ नगरपालिकेच्या पार्श्वभूमिवर नगराध्यक्षासहीत १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र शहराच्या विकासाच्या बाबतीत त्यांचे आळशी धोरण राहिले आहे. असे राष्ट्रवादीचे आमदार संतोष चौधरी यावेळी म्हणाले. तर एक गेला तर दुसरा येईल, कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी दिली.