भाजपच्या ‘या’ महिला नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंची उपस्थिती

539

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला भरती तर भाजपला वोहोटी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या नवी मुंबई जिल्हा सचिव संगिता भागरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

संगिता भागरिया यांच्यासोबत भाजपच्या पुजा सक्सेना, विजया पाटील, सरन्या नायडू अशा अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. यासोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि नवी मुंबई युवक कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, दिपेश मढवी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आज पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, स्वाती माने आदी उपस्थित होते.