पवारांच्या बारामती नगरपालिकेवर फडकले काळे झेंडे

7

बारामती म्हटलं की आधी पवार कुटुंबीय डोळ्यासमोर येतं. त्याच बारामतीतून अनोखी बातमी समोर आली आहे. बारामतीमधील अनोख्या निदर्शनाची चर्चा सध्या होत आहे. कारण, पहिल्यांदाच बारामती नगरपालिकेवर काळे झेंडे फडकल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवत आंदोलनं करण्यात आले. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावे, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं.

आंदोलन ठिकाणी नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते. काळे झेंडे फडकल्याची बातमी समजताच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकराची दखल घेतली आहे. आणि तातडीने कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलावले आहे. काल संध्याकाळी पाच वाजता ही बैठक झाली.