नुकत्याच राज्यात ग्रामपंचात निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र पुण्याच्या वडगाव मावळमध्ये नविनच प्रकार उघडकीस आला आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याची घटना याठिकाणी घडली. टाकावे ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांची नावे असलेली लिंबे खिळ्याने पिंपळाच्या झाडाल ठोकण्यात आली आहे.
टाकावे येथील इंद्रायणी नदीच्या कडेला ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषीनाथ शिंदे यांची नाव असलेली लिंब पिंपळाच्या झाडाला खिळण्याने ठोकण्यात आली आहे. सरपंच- उपसरपंच पदावरुन हा प्रकार घडला असल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे.
अविनाश असवले यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. वैज्ञानिकतेच्या २१ व्या शतकात याप्रकारच्या घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना ही ईंटरनेटवर प्रचंड व्हायरल होते आहे.