सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ जास्त प्रमाणात खळबळ माजली होती. मुंडे यांच्या पाठीमागचे संकट संपत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे-रेणू शर्मा हा वाद मिटत असतानाच मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येताना दिसत आहेत.
धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचं कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे हे मंदिरात गेले होते. तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन नुकतेच संपले होते.
धनंजय मुंडे श्रोत्यांच्या गर्दीत जाऊन इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकत बसले होते. यावेळी बोलताना धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. तसेच, संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.