दृष्टिहीन रिना पाटलांना मिळाला ‘हा’ मान

9

नागरिक आणि पोलीस यांच्यात अनोखे नाते निर्माण व्हावे यासाठी पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. पोलिसांच्या संकल्पनेतून दृष्टीहीन असलेल्या रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला. ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. या दोघीना दिलेल्या विशेष सन्मानाने त्या भारावून गेल्या होत्या.

सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी हा उपक्रम राबविला. याच सारखं एक दिवसाचा पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त बनण्याचं स्वप्न अंध, विधवा आणि झोपडपट्टी मधील युवकांचं पूर्ण झाले आहे. प्रजासत्ताकदिनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हे घडलं आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रीना पाटील यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सॅल्युट केला. तसेच पतीचं निधन झाल्यानंतर जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सल्युट केला. एक दिवसासाठी का होईना या सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याने या दोघीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.