एखादे प्रेमीयुगल एकमेकांना बघून डोळा मारतात, फ्लाईंग कीस करतात. मात्र ईतरांसोबत किंवा समोरच्या मान्य नसल्यास असे कृत्यु केल्यास तुमच्याबर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशाच एका प्रकरणात निर्णय देत कोर्टाने आरोपींस शिक्षा सुनावली आहे.
२९ फेबृवारी २०२० रोजी पिडीता आपल्या बहिणीसोबत घराबाहेर फीरायला बाहेर पडली असता, एका युवकाने २० वर्षीय युवकाने पिडितेस डोळा मारला आणि फ्लाईंग कीस केलं. परिणामी पिडिता ही मानसिक तणावाखाली होती. पिडित तरुणीने संपूर्ण प्रकार कुटुंबाला सांगीतल्यानंतर संबंद्धित आरोपीवर एलटी रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर कोर्टाने सुनावणीदरम्यान आरोपी गुन्हेगार असून त्यांस एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पिडिता अल्पवयीन असून १४ वर्शांची असल्यामुळे लैंगीक गुन्हा बाल संरक्षक कायदा म्हणजेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोळा मारणे, फ्लाईंग कीस करणे हा एक प्रकारचा लैंगीक छळ असल्याचे मत कोर्टाने नोंदवले. त्यामुळे डोळा मारणे, फ्लाईंग कीस करणे यासंबंद्धि लैंगीक छळाचा गुन्हा ठरु शकतो. कोर्टाने सोबतच आरोपीस १५ हजार रुपयांचा डंडसुद्धा ठोठावला आहे. पैज लावण्यावरुन हा प्रकार केला असल्याचा आरोपीने कोर्टात सांगीतले आहे.