परिवर्तन संस्थेच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

41

दरवर्षी स्व. आकाश ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिवर्तन बहूद्देशीय संस्थेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षिदेख रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा याठिकाणी कामक्षा माता मंदिर येथे हे शिबीर संपन्न झाले.

या रक्तदान शिबीरात एकुण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचासुद्धा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे ऊद्घाटन कारंजा शहराचे तहसिलदार धीरज मांजरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सतीश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. प्रकाश डहाके यांची ऊपस्थिती होती.

स्व. आकाश ठाकरे याचा शहरातील सामाजिक कार्यात नेहमिच पुढाकार असायचा. कमी वयातच आकाश ठाकरे यांना देवाज्ञा झाली. मात्र त्यांचे कार्य निरंतर सुरु ठेवण्याचा ध्यास त्यांच्या मित्रपरिवाराने घेतला आणि त्यातूनच परिवर्तन या सामाजिक संस्थेचा ऊदय झाला. आकाश सामाजिक कार्यात नेहमिच अग्रेसर असायचा त्यामुळे त्याच्या स्मृतीदिनी आयोजित करण्यात येणार हे रक्तदान शिबीर हीच त्यास खरी श्रद्धांजली आहे. असे मत परिवर्तन संस्थेच्यावतीने यावेळी मांडण्यात आले.

यावेळी साई रक्त जिवन रक्तपेढी अकोला यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास दिलीप रोकडे, शेख सर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांचे विशेष सहाय्य लाभले होते. कार्यक्रमाच्या पुर्णत्वासाठी परिवर्तन बहूउद्देशीय संस्था कारंजा, श्री. छत्रपती प्रतिष्ठान अकोला तसेच स्व. आकाश ठाकरे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.