राज्यात मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अजितदादा युथ फाऊंडेशन व आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे बारामती येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून बारामती शहराच्या आसपासच्या सर्वच गावांतील ग्रामस्थ रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शर्मिला पवार अध्यक्षा शरयू फाऊंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५०० पेक्षा अधिक बाटल्या रक्तदान झाले आहे. बारामती परिसरातून या रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरामध्ये सहाशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.