देगलूर : तालुक्यातील मरखेल येथे सर्वोदय ग्रामविकास फौंडेशन संचालित ‘माझं मरखेल माझं अभिमान’ अभियान व गावातील नवयुवकांच्या संयुक्त विद्यमाने 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड च्या या संकटामुळे राज्यात विशेषतः शासकीय रुग्णालयांत रक्ताचा खूप मोठा तुटवडा पडला होता अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रक्तासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला रक्तदानासाठी आवाहन केले आहेत.
अल्पशा वेळेतच रक्तदान शिबिराचे आयोजन करून नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीच्या वैद्यकीय टीमशी संपर्क साधून शिबिराचे आयोजन केले आणि मरखेल सारख्या ग्रामीण भागातही विक्रमी 70 लोकांनी रक्तदान केला. विशेष कौतुकाची बाब म्हणजे युवकांसोबत काही युवतींनीही रक्तदान करून ग्रामीण भागातील महिलाही रक्तदान देऊ शकतात असा सकारात्मक पायंडा पडला.
मरखेल पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनीही रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सफरचंद आणि केळी असा फलोपाहर देऊन रक्तदात्यांना व आयोजकांना प्रोत्साहित केले. पत्रकार पांडुरग गवाले व व्यापारी अक्रम अत्तार यांनींही आयोजनासाठी आर्थिक मदत देऊन शिबिराच्या आयोजनाला हातभार लावला. माझं मरखेल माझं अभिमान अभिनयातील सभासद व गावातील तरुणांनी रक्तदान शिबिरासाठी अमूल्य असे परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवलं.