राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : सुप्रिया सुळे

6

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचनावजा आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.पत्रात म्हटल्यानुसार प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावेअसेही पवार यांनी म्हटले आहे.

या पत्राचा संदर्भ घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. 

सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपले आवाहन आहे की, कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यावीत.असेही सुप्रीया सुळे यांनी सांगितले आहे.