इंदापूर: इंदापूर- निमगाव केतकीत व्याहळी रोडवरील महालक्ष्मी मंदीराजवळ २९ मार्चला सकाळी धोंडीबा नामदेव रूपनवर (वय६०) रा. दगडवाडी हे डोक्याला जखम झालेल्या मृृृृतावस्थेत पोलिसांना आढळून आले.
घटनास्थळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर तपासत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.
सुरूवातीला पोलीसांनी आकस्मात मृृृृत्युची नोंद पोलीस दप्तरी केली होती. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळाच्या तपासावरून सदरची घटना आज आकस्मात मृत्यू नसून खुन झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत पोपट धोंडीराम रूपनवर (वय ३४) रा.दगडवाडी यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. तर धनाजी विठ्ठल करे (वय ३८) रा.बराल वस्ती असे गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.