प्रख्यात अभिनेते आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परझानिया, ब्लॅक फ्रायडे, वन्स ऑपोन ए टाइम इन मुंबई चित्रपटांबरोबरच पाताललोक सारख्या वेब सीरिजमध्ये आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांना आपलेसे करणारे असिफ बसरा यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. एक लोकप्रिय अभिनेता म्हणून आसिफ बसरा यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पडली होती.
पाच वर्षांपासून बसरा हे आपल्या परदेशी मैत्रिणीसोबत मैक्लोडगंज येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येच काय कारण आहे. याचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील धर्मशाळा येथे एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली आहे. कांगडाचे एस पी विमुक्त रंजन यांनी याबाबत कुठलीही खात्रीशीर माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.