‘जाने तु या जाने ना’ मधील गाजलेला अभिनेता आणि अमीर खानचा भाचा इम्रान खान सिनेसृष्टीला रामराम ठोकतोय अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे. उत्तम अभिनय आणि लेखन यामुळे हा अभिनेता सुपरस्टार ठरला होता. बऱ्याच दिवसांपासून इम्रान मोठया पडदयापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडलं आहे. 5 वर्षांपासून इम्रान कोणत्याचं चित्रपटात दिसला नाही. 2008 मध्ये त्याने ‘जाने तु या जाने ना’ या चित्रपटातुन पदार्पण केलं होतं.
त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरोयने याबाबत खुलासा केला आहे. अक्षयने दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, इम्रान माझा जवळचा मित्र आहे, तो अभिनय करियरला पूर्णविराम देण्याच्या विचारात आहे. गेली 18 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. तो उत्तम लेखक आणि दिग्दर्शक होऊ शकतो पण त्याने हे करावं असं मी त्यांच्यावर दबाव आणणार नाही. अगदी पहाटे 4 वाजता ही आम्ही एकमेकांच्या मदतीला जाऊ शकतो. ‘यानंतर अक्षय म्हणाला, इम्रानने अभिनय क्षेत्रात जरी पूर्णविराम घेतला तरी तो चित्रपटश्रुष्टीतुन पुर्णपणे बाहेर जाणार नाही. तो दिग्दर्शक क्षेत्रात लवकरचं काम सुरू करेल.
इम्रान खान खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी अवंतीका मलिक हिच्याशी घटस्फोट घेणार असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरली होती. परंतु अवंतिकाच्या आईने ही चर्चा फेटाळून लावली होती. 2011 मध्ये इम्रान आणि अवंतिका यांचे लग्न झाले. त्यांना इमारा नावाची एक मुलगी आहे. याआधी 2015 मध्ये इम्रान, कंगना रनौत सोबत कट्टी बट्टी या चित्रपटात दिसला होता. त्यांनंतर तो एकदाही पडद्यावर दिसला नाही.