बॉलीवूडचे प्रसिद्ध खान तसे काहीच वेळा एकत्र येतात. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा इतिहास रचून जातात. सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा एकत्र येण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या दोन दिग्गज कलाकारांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र झळकावे अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे.
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या आगामी चित्रपटाचे नाव ‘पठाण’ असे आहे. या चित्रपटात सलमान खान देखील झळकणार आहे. खूप वेळानंतर दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. शाहरुख खानच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत काही ठोस माहिती समजली नाही परंतु बीटाऊनमध्ये चर्चा सुरू आहेत. अहवालानुसार ‘यशराज फिल्म’ स्टुडिओमध्ये ‘पठाण’ फिल्म ची शूटिंग होणार आहे.
दरम्यान, या चित्रपटात अॅक्शन असणार आहे. सलमान यात एक लहानसा कॅमीयो सीन देणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. शाहरुख खान सोबत बॉलीवूडची मस्तानी दिपीका पादुकोन आणि जॉन इब्राहिम हे दोन कलाकारही यामध्ये झळकणार आहेत. येत्या काळात चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.