आज सुपरस्टार सलमान खानचा आज 55 वा वाढदिवस आहे. अभिनेता सलमान खान नेहमीचं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. सलमान खानने यंदाचा वाढदिवस मुंबईत न सेलिब्रेट करता चक्क पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेट केला आहे. या सेलिब्रेशनचे खास फोटोज समोर आले आहे. या फोटोत सलमान खान स्काय ब्लू रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे.
त्याच्या जीवनातील या खास दिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियापासून ते अगदी त्याच्या घराबाहेरील परिसरापर्यंत आनंदाचं वातावरण दरवर्षी पाहायला मिळते. काल पनवेलमधील आपल्या खास शैलीत सलमान केक कापताना दिसला आहे. सल्लू भाईच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात असलेल्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमते. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे गर्दी न करण्याचं आवाहन सलमानने चाहत्यांना केले आहे. त्यांनी अपार्टमेंच्या बाहेर याबाबत एक फलक देखील लावला आहे.
वडील सलीम खान, बहीण अलविरा अग्निहोत्री पनवेल फार्महाऊसवर गेले आहेत. याशिवाय बाबा सिद्दीकी, शाइना एनसी, अभिनेता सुनील ग्रोवर यांच्यासमवेत इतर पाहुणे बर्थडे सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहचले आहेत. यंदा कोरोनामुळे पार्टी आणि सेलिब्रेशन करण्याचे सलमान खानने टाळले आहे