बॉलीवूडची ‘मस्तानी’ कोरोनाच्या विळख्यात ; वडील प्रकाश पादुकोनसह आई- बहिणीला कोरोनाची लागण

13

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बुधवारी हाती आलेल्या माहितीनुसार बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण झाली आहे.


कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाउन जाहिर केले आहे. यामुळे दीपिका पादुकोन ही तिच्या आई वडीलाकडे बंगळुरुला गेली होती. यादरम्यान काही दिवसापुर्वी दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. आता दीपिकालाही कोरोना विषाणुची लागण झाली आहे.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश पादुकोन यांची प्रकृती स्थिर आहे. या आठवड्याच्या शेवटी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. याबरोबर दीपीकाची आई आणि बहिण या दोघीनांही कोरोनाची लागण झाली आहे. यादरम्यान दीपिकाच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. दिपीका सध्या बेंगलोरला तिच्या परिवारासोबत आहे.